गुहागर : नगरपंचायतीचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांची नियुक्ती झाल्यापासून गुहागर शहरात Guhagar शून्य कचरा मोहीम राबविण्यात येत आहे. २ ऑक्टोबरपासून याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. याचे उल्लंघन करण्याऱ्यावर गुह्याची व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. गेले १५ दिवस शहरातील महत्वाची ठिकाणी स्वच्छ करण्याची मोहीम राबवली जात आहे.
गुहागर शहरातील मच्छीमार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. मच्छीमार्केटच्या बाजूला असलेल्या कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य गेली तीन दिवस उचलले जात होते. मात्र, त्यानंतर तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला असून, मच्छी विक्रेत्यांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील एक ते दीड कि. मी. अंतरावरील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. तेथील जागा नगरपंचायतीने स्वच्छ केली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्याबरोबर कॉलेचे विद्यार्थीही मोहिमेत सहभागी झाले होते. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेले गवत काढण्यात आले.
नगरपंचायतीने संपूर्ण शहरात घरपट स्वच्छतेबाबत काटेकोर अंमलबजावणीचे प्रसिद्धीपत्रकच काढले, माझा कचरा माझी जबाबदारी कचऱ्याचे वर्गीकरण करा, स्वच्छतेची कास धरा, अशा घोषवाक्यांनी शून्य कचरा मोहीम राबवली आहे.
ओला कचरा, सुका कचरा, घरगुती अपायकारक कचरा स्वतंत्र करून देण्याचे आवाहन केले. याची अंमलबजावणी सुरू झाली असून, एकत्रित कचरा देणाऱ्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. कचरा देताना वर्गीकरण करून न दिल्यास पहिल्या वेळी २०० रुपये दंड, दुसऱ्या वेळेही ३०० रुपये दंड आकारला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणे यासाठी पहिल्यावेळी ३००० रुपये दंड, दुसऱ्यावेळी तोच प्रकार केल्यास १००० रुपये दंड होणार आहे कचरा जाल्याबद्दल ५००० रुपये दंड, सार्वजनिक सभा, समारंभ संपल्यानंतर चार तासांच्या आत स्वच्छता केल्यास स्वच्छता अनामत रक्कम जमा केली जाणार आहे.
नागरिकांना आवाहन
रस्ता मार्गावर कचरा करणाऱ्याला १५० रुपये, उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला १०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुकणे १०० रुपये, तर उघड्यावर शौचालय करणे याला ५०० रुपये दंड होणार आहे. गुहागर शहर कचरामुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली असून, शहराच्या स्वच्छतेसाठी शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:10 PM 03/Oct/2024














