रत्नागिरी : बेदरकारपणे ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात अलोंरे शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटन रविवार १६ फेब्रुवारी रोजी ५.४५ वा. सुमारास कुंभार्ली घाटातील वळणात घडली सचिन सुरेश शिरकर (रा. मुरादपूर कुंभारवाडी, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्या आलेल्या संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात अमित दिलीप कांबळ (३७, रा. कापसाळ डिगेवाडी, चिपळूण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारं सायंकाळी संशयित हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-०९-सीयू-६५६३) घेऊ गुहागर विजापूर जाणाऱ्या रोडने चालवत पुणे येथे जात होता. तो मौजे पोफळ येथील कुंभार्ली घाटातील एका वळणावर आला असता घाट वळणावळणाचा व चढावाच आहे हे माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करत अपघात केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 19/Feb/2025














