राजापूर : ओणी- अणुस्कुरा- रायपाटण रस्ता दुरुस्ती कामाचे भूमिपूजन

राजापूर : जिल्हा नियोजन अंतर्गत माजी केंद्रीयमंत्री आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या शिफारसीने सुमारे १५ लाख रुपयांच्या मंजूर झालेल्या ओणी-अणूस्कुरा मुख्य रस्ता ते रायपाटण, पाळेकरवाडी या रस्त्याचे भूममिपूजन भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जब्बार काजी यांच्या हस्ते रविवारी (दि.१६ फेब्रुवारी) पार पडले. याप्रसंगी रायपाटण गावचे सरपंच नीलेश चांदे, उपसरपंच विजय जड्यार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

रायपाटण, पालेकरवाडी येथील खराब बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू होते. खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार या कामासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत १५ लाख रुपये मंजूर झाले. त्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी पार पडला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 19/Feb/2025