चिपळुणात आज श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान

चिपळूण : येथील मराठा क्रांती मोर्चा व चिपळूण मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते व इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांचे ‘उत्तम प्रशासक शिवछत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. १९ रोजी सायंकाळी ६ वा. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रामध्ये हे व्याख्यान होईल. या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. नव्या पिढीला महाराजांचे जीवनकार्य कळावे या हेतूने शिवचरित्रावर पीएच.डी. केलेले श्रीमंत कोकाटे हे या वेळी बोलणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 19/Feb/2025