रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ धनजी नाका ते जुन्या बाजारपेठेपर्यंत आहे. याठिकाणच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, या रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने या ठिकाणच्या दुकानदारांनी रत्नागिरी नगर परिषदेसह माजी नगरसेवक विकास पाटील आणि वैभवी खेडेकर यांना निवेदन दिले.
रत्नागिरी शहराची मुख्य बाजारपेठ ही धनजी नाका ते बाजारपेठेपर्यंत आहे. या ठिकाणी किराणा दुकानांसह भाजी, मच्छीमार्केट असल्याने या मार्गावर वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या वर्षभरापूर्वीपासून होणार आहे. काम मंजूर आहे, असे सांगितले जात होते. परंतू प्रत्यक्षात डांबरीकरण झाले नाही.
रस्त्याचा कामासाठी न. प.ला सह्यांचे निवेदन दिले. त्याचबरोबर या प्रभागातील माजी नगरसेवक विकास पाटील आणि वैभवी खेडेकर यांनाही निवेदनाची प्रत दिली. त्यानुसार पाटील आणि शिवसेना नेते विजय खेडेकर यांनी बांधकाम विभागाचे अभियंता यतिराज जाधव यांची भेट घेतली. अभियंत्यांनी हा रस्ता लवकरच डांबरीकरण होईल, असे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 19/Feb/2025














