मोडका आगर : Guhagar गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी बाजारपेठेतील श्री नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर पासून नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी नवरात्र उत्सव मंडळ ३९ व्या वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. श्री दुर्गा मातेची पूजा आरती व प्रसाद रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. श्री दुर्गा मातेची पूजा आरती व प्रसाद रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेची पूजा व आरती व प्रसाद सायंकाळी ७ वा. श्री गणेश भजन मंडळ वाणी वाडी जानवले यांचे सुश्राव भजन बुवा ओंकार कोकाटे रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, रविवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेची पूजा आरती व प्रसाद रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गामाते पूजा आरती व प्रसाद रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. श्री दुर्गामातेची पूजा आरती व प्रसाद सायंकाळी ७ वाजता ह भ प प्रज्ञा धामणस्कर यांचे वारकरी कीर्तन रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेची पूजा आरती व प्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री चिंतामणी संगीत कला मंच कौंढर काळसूर यांचे बाल कलाकारांचे सुस्वर भजन, रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा माते पूजा आरती व प्रसाद सायंकाळी ५ वाजता माऊली भजन मंडळ जानवळे वाणीवाडी नंबर १ यांचे सुश्राव भजन रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेची पूजा आरती व प्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रात्री ११ नंतर आरती व प्रसाद, शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेची पूजा आरती व प्रसाद, रात्री ९ वा. सोने लुटणे सामुदायिक कार्यक्रम रात्री ११ वाजता दुर्गा माते समोरील श्री फळांचा, वस्त्रांचा लिलाव, रात्री १२ नंतर आरती व प्रसाद, रविवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा माती पूजा आरती व प्रसाद सकाळी ११ नंतर उत्तर पूजा व आभार प्रदर्शन सायंकाळी ३ नंतर श्री दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन मिरवणूक प्रारंभ समारोप मोडका आगर येथे होणार आहे. या नवरात्री कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश कोळवणकर, कार्याध्यक्ष मोहन शेठ संसारे, उपाध्यक्ष विश्वास बेलवलकर, सचिव श्रीकांत शिर्के यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 03/Oct/2024














