Bank of Baroda Recruitment 2025 : नवी दिल्ली : पदवीधर झालेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया १९ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार ११ मार्च २०२५ पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदाने एकूण ४००० अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अप्रेंटिस उमेदवारांची ही पदे भरली जातील. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. तसेच, निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे.
कोण करू शकतं अर्ज?
बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. अर्जदाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क किती?
जनरल आणि ओबीसी कॅटॅगरीतील अर्जदारांना अर्ज शुल्क म्हणून ८०० रुपये भरावे लागतील. तसेच, अनुसूचित जाती आणि जमाती कॅटॅगरीतील उमेदवारांना अर्ज शुल्क ६०० रुपये आणि दिव्यांग अर्जदारांसाठी ४०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आला आहे. तसेच, सर्व कॅटॅगरीतील अर्जदारांना जीएसटी शुल्क देखील भरावे लागणार आहे.
कसा करावा अर्ज?
– बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
– होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबवर क्लिक करा.
– यानंतर आता Current Opportunities वर क्लिक करा.
– अप्रेंटिस अप्लायच्या लिंकवर क्लिक करा.
– यानंतर रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा.
– तसेच, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि जे काही शुक्ल असेल, ते भरून फॉर्म सबमिट करा.
कशी राहील निवड?
अप्रेंटिस पदासाठी अर्जदारांची निवड सीबीटी परीक्षा, भाषा टेस्ट, मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे केली जाणार आहे. परीक्षेत सामान्य आणि आर्थिक जागरूकता, हिंदी/इंग्रजी परिमाणात्मक आणि तर्क योग्यता, कॅम्प्युटर ज्ञान आणि सामान्य इंग्रजीशी संबंधित प्रश्न विचारले जातील. याशिवाय, अधिक माहितीसाठी उमेदवार बँकेने जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 20-02-2025
