Ratnagiri : जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत मराठा मंदिर अ.के. देसाई हायस्कूल विजयी

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली देवरुख येथे उत्साह संपन्न झाल्या. सन 2024 या शैक्षणिक वर्ष जिल्ह्यातील 13 संघांनी हॉकी या राष्ट्रीय खेळात सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या 17 वर्षाखालील व 14 वर्षाखालील मुलींच्या संघांनी विजय संपादन केला. सुमारे पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या उत्साहात मराठा मंदिर संस्थेच्या विशेष सहकार्याने आणि माजी विद्यार्थ्यांचे प्रयत्नाने प्रशालेमध्ये हॉकीचे प्रशिक्षण सुरू झाले. हॉकी ह्या राष्ट्रीय खेळ प्रशालेतील मुलींना कसा खेळावा हे माहीत नव्हते.

स्टिक कशी पकडावी, गोल पोस्ट, गोली, मैदान याबाबत पूर्वज्ञान नसतानाही प्रशालेतील मुलींना प्रशिक्षित करण्याचे शिवधनुष्य प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यानी यांनी उचलले आणि नियोजनपूर्वक सरावाला सुरुवात केली. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता हॉकीचा सराव सुरू होता. कधी शाळेच्या मैदानावर तर कधी शाळेच्या टेरेसवर सराव सुरू होता.

सरावासाठी सर्वंकष विद्यालयाने सुद्धा फार मोठे सहकार्य केले. प्रशालेतील मुलींना हॉकीचे ज्ञान नसताना त्यांना हॉकीचे प्रशिक्षण देणे हे कठीण काम प्रशिक्षक उत्तम करत होते याबद्दल मुख्याध्यापिका दळी मॅडम यांनी समाधान व्यक्त केले.

14 वर्षाखालील मुलींचा सामना देवरुख शाळा क्रमांक 4 यांच्याबरोबर झाला. या सामन्यात देसाई हायस्कूलने एका गोलची आघाडी घेत पदार्पणातच विजयाची मोहर उमटवली तर 17 वर्षाखालील संघाला प्रतिस्पर्धी संघ नसल्याने त्या संघाला विजयी संघ म्हणून घोषित करण्यात आला.

17 वर्षाखालील व 14 वर्षाखालील मुलींच्या दोन्ही संघाची निवड विभागीय हॉकी स्पर्धेसाठी झाली आहे. दोन्ही हॉकीचे संघ तयार करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक संतोष गार्डी यांचे योगदान फार मोठे आहे.. त्यांच्यामुळे आणि प्रशालेतील इतर सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हॉकी संघ तयार झाला असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचे योगदान प्रचंड आहे यापुढे अशाच प्रकारचे सहकार्य करण्याचे वचन माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेस दिले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा मेडल देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर प्रशिक्षक श्री सुशांत पवार, श्री जीवन जाधव, श्री सचिन मटकर, श्री विकास साळवी, श्री अजय कांबळे, श्री आदित्य शिवगण यांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली व हॉकी खेळणाऱ्या मुलींना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभाला सुदेश निवळकर आणि रणजीत सुवारे हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका दळी मॅडम यांनी दोन्ही संघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री विनोद गावखडकर सर यांनी केले तर आभार श्री सचिन मोहिते सर यांनी मांडले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सूत्र संचालन श्री संतोष गार्डी यांनी केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 03/Oct/2024