दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीसंदर्भात विनायक राऊत आज मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेणार

मुंबई : कोरोना काळात बंद करण्यात आलेली दादर – रत्नागिरी आणि दादर – सावंतवाडी पॅसेंजर गाडीच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्ठमंडळ आज (२० फेब्रुवारी) पुनश्च एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची दुपारी ३.३० वाजता भेट घेणार आहे.

शिष्टमंडळामध्ये खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत, अरुणभाई दुधवडकर, आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या ॲड. श्रीमती सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होतील

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 PM 20/Feb/2025