Sangmeshwar : लोवले येथे नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने आरोग्य शिबीर

संगमेश्वर : नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग व बुरंबी आरोग्य केंद्र अंतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर ग्रामपंचायत लोवले येथे घेण्यात आले. तसेच स्वछता जनजागृती रॅली काढण्यात आली.

मोफत सामुदायिक आरोग्य शिबिराअंतर्गत गावातील महिलांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, बुरंबी आरोग्य केंद्राच्या श्रीमती सपना नाईक, लॅब सहाय्यक श्रीमती मोरे, आरोग्य सहाय्यक श्री. शिंदे, ग्रामपंचायत सरपंच सौ. ऋजुता कदम, ग्रामसेवक अभिनंदन पाताडे, आशा सेविका यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 03/Oct/2024