Ratnagiri : रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी विलास कोळेकर, सचिवपदी अनिल चव्हाण यांची नियुक्ती

रत्नागिरी : तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी निवड ए.डी. नाईक हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडली. या निवडीत रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे दि मॉडेल स्कूलचे उपक्रमशील मुख्याध्यापक विलास कोळेकर यांची रत्नागिरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तर सचिवपदी रत्नागिरी शहरातील गोदूताई जांभेकर विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

तालुका मुख्याध्यापक संघाच्या सचिवपदी अनिल चव्हाण, उपाध्यक्ष श्री. प्रकाश मांडवकर, सहसचिव श्री. महेंद्र कुवळेकर, खजिनदार श्री. मंगेश जाधव सदस्यपदी श्री प्रदिप वाघोदे, श्री शांताराम धूळ, सौ. नूतन कांबळे, सौ. स्नेहा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कौन्सिल सदस्य म्हणून श्री. बिपीन परकर, श्री दत्तात्रय रायरीकर, श्री. अविनाश कदम, श्रीमती साजिदा बिजापुरी यांची तसेच जिल्हा सदस्य म्हणून श्री. श्रीशैल्य पुजारी, श्री अरुण जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत ए.डी. नाईक गर्ल्स हायस्कूल रत्नागिरी येथील मुख्याध्यापक समीर गडबडे यांनी केले. आभार नवनिर्वाचित सचिव श्री. अनिल चव्हाण यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 03/Oct/2024