Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे.
यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे.
अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता आजपासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
9 लाख महिलांची या योजनेतून नाव कमी करण्यात येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे.वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.
21-65 वयोगटातील महिलांना मिळतात 1500 रुपये
राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabh Election) आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 21-02-2025
