Ratnagiri : जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील ज्येष्ठ कर्मचारी रविंद्र गवाणकर सेवानिवृत्त

रत्नागिरी : तालुक्यातील जि.प. कळझोंडी धरण येथे जयगड प्रादेशिक नळपाणी (jaigad pradeshik nalpani yojana) योजनेतील ज्येष्ठ कर्मचारी रविंद्र सिताराम गवाणकर हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्ती होत असल्याने त्यांचा सपत्नीक शुभेच्छा गौरव समारंभ सुपरवायझर दत्ताराम निंबरे यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ कर्मचारी केशव शितप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी सुपरवायझर आनंदा मुळ्ये, प्रकाश भागुराम पवार, श्री. मावळणकर, विनायक महाकाळ तसेच जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे फिटर विनायक शितप, रविंद्र जाधव, सुनिल दुर्गवळी सत्कारमूर्ती रविंद्र गवाणकर, सौ. गवाणकर यांचे कौटुंबिय व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

प्रारंभी सेवानिवृत्त कर्मचारी रविंद्र गवाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत किशोर पवार यांनी केले. त्यानंतर सत्कार मूर्ती रविंद्र गवाणकर यांना कर्मचारी वर्गाकडून शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तर सौ. गवाणकर यांना साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री गवाणकर यांनी गेली अडतीस वर्षे जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेत अतिशय उत्तम सेवा केली. त्यांच्या या प्रदीर्घ अश्या सेवेबद्दल उपस्थित मान्यवर कर्मचारी वर्गाने आपल्या मनोगतातून श्री गवाणकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

सत्कारमूर्ती श्री. गवाणकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, माझ्या या वाटचालीमध्ये सुपरवायझर व सर्व कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले. त्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार किशोर पवार यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 03/Oct/2024