रत्नागिरी : शहरातील खालची आळी येथील २४ वर्षीय तरुणाचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वा. सुमारास घडली. विघ्नेश शशिकांत आंबेकर (२४, रा. खालची आळी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विघ्नेश आंबेकर हा घरी असताना तो अचानकपणे आजारी पडला.
त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना १३ फेब्रुवारी रोजी विघ्नेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 24/Feb/2025













