रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथे स्वयंभू जागृत श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थानात प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्री उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त सोमवार २४ ते गुरुवार २७ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. २४ रोजी सकाळी ८ ते १० प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन मातृका पूजन (पंचांग कर्म), सकाळी ११ ते २ वा. द्वादशलिंग तो भद्रमंडल स्थापना, पीठ स्थापना व महारुद्र अभिषेक, दुपारी ३ ते ६ ग्रहयज्ञ, रुद्र हवन, सायंकाळी आरती आणि रात्री श्री जय संतोषी माता लोकनाट्य नमनाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. २५ रोजी सकाळी ९ ते ११ वा. स्थापित देवता पूजन, बिल्वार्चन, महारुद्र अभिषेक, दु. ३ ते ६ वा. महारुद्र हवन, सायंकाळी आरती, रात्री ८ ते १२ वा. बुवा विनोद चव्हाण आणि बुवा सुशील गोठणकर यांच्या भजनाचा डबलबारी सामना होणार आहे.
बुधवार दि. २६ रोजी सकाळी ९ ते १ वा. स्थापित देवता पूजन, महारुद्र अभिषेक, दुपारी ३ ते ६ पुष्पार्चन, बिल्वार्चन, सायंकाळी आरती. सायं. ७ ते ९ वा. महाकुंभ मृत्तिकेचे पूजन व महाकुंभ त्रिवेणी संगम जलाने दुबळेश्वराचा महाअभिषेक, रात्री १० ते ३ वा. महारुद्र अभिषेक, महारुद्र स्वाहाकार, बलिदान पूर्णाहुती, महाआरती होणार आहे. गुरुवार दि. २७ रोजी दुपारी १२ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभघ्यावा, असे आवाहन स्वयंभू श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, मराठवाडी, धरणावर, वरचा बठार, मालगुंड यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 24/Feb/2025














