मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी मुंबईतील एका विवाह समारंभात भेट झाली. मुंबईतील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले.
यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी संवाद साधला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरेही होत्या.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वार्तालाप सुरु असताना काहीतरी विनोद झाला असावा. त्यामुळे रश्मी ठाकरे या हसताना दिसत आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा 36 चा आकडा असला तरी हे दोन्ही बंधू एकमेकांशी उत्तम पद्धतीने संवाद साधताना दिसून आले.
अलीकडच्या काळात राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक पुन्हा वाढताना दिसत आहे. भाजपचे नेते त्यांच्या निवासस्थान येऊन गेले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा वाकयुद्ध रंगताना दिसेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 24-02-2025














