मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.
विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, या साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले आहेत, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असा देखील ठराव घेण्यात आला. धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, नैतिकता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे आता विद्रोही साहित्य संमेलनामध्ये देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 24-02-2025














