रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटनेच्या मान्यतेने रोहनराज सावंत ॲक्वा क्लब आयोजित व एस. एम. स्विमिंग कोचिंग इन्स्टिट्यूट रत्नागिरी यांच्या नेटक्या नियोजनाने “लिटिल चॅम्प जलतरण स्पर्धा”आमदार श्री. किरण सामंत यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडल्या. दी.22 फेब्रुवारी 2025 रोजी मराठा मंदिर ग्लोबल स्कूल स्विमिंग पूल येथे 75 जलतरण पटटू च्या निःशुल्क सहभागाने आमदार किरण सामंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून “लिटिल चॅम्प जलतरण स्पर्धेचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, क्रेडाई असो. चे अध्यक्ष श्री. नित्यानंद भुते यांनी आपल्या भाषणात परम सावंत याच्या 1 मार्च रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त जलतरण स्पर्धा निःशुल्क भरवून व स्वतः सहभाग नोंदवून एक वेगळा आदर्श खेळाडूंसमोर ठेवला याबद्दल आयोजक श्री. दिनकर सावंत यांचे कौतुक केले तसेच एस. एम. स्विमिंग कोचिंग इन्स्टिट्यूट रत्नागिरी चे संचालक श्री व सौ. मनिषा बेडगे परिवार यांनी स्पर्धेचे उत्तम, नेटके नियोजन केल्याबद्दल विशेष कौतुक करून अश्या प्रकारच्या स्पर्धा नेहमी आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहित करावे असे मार्गदर्शन केले. यावेळी मराठा मंदिर ग्लोबल स्कूल रत्नागिरी संस्थेच्या सेक्रेटरी सौ. ममता नलावडे मॅडम, क्रेडाई असो. चे अध्यक्ष श्री. नित्यानंद भुते, माजी नगरसेवक श्री. महेंद्र साळवी, प्रथितयश उद्योजक श्री. विजय खेडेकर, मराठा मंदिर ग्लोबल स्कूल च्या कोऑर्डिनर सौ. हर्षदा दीपक शेट्ये,सौ. अनिशा मुळ्ये मॅडम, रत्नागिरी जिल्हा जलतरण असो.चे अध्यक्ष श्री. मनोज साळवी,उपाध्यक्ष गोपाळ बंगलोरकर, खजिनदार श्री. संजय बेडगे, सचिव मनिषा बेडगे , रोहनराज सावंत ॲक्वा क्लब चे अध्यक्ष श्री दिनकर सावंत, स्कूल च्या क्रीडा शिक्षिका केतकी सावंतदेसाई,सौ. दीक्षा गोळपकर, पूजा साळवी, श्री. गौरव सुर्वे,मीरा ठाकूर, निलम बुडाकोटी, प्रज्ञा सावंत, वैदेही धामणस्कर, तमन्ना मिस, तैयब्बा मिस, मिस्बाह मिस, मुस्कान पठाण इ.मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत पंच म्हणुन स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे लेव्हल 2 सार्टिफाय कोच श्री.प्रथमेश बेडगे, श्री. देवेन बेडगे, श्री. मोदीन जमादार, कु. तनया सावंत, कु. तीर्था सावंत यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सतिश महाडिक सर यांनी केले. स्पर्धा वय वर्षे 5, वय वर्षे 7 व वय वर्षे 8 (मुले _ मुली) या तीन गटात घेण्यात आली .
स्पर्धेचा निकाल : 5वर्षा खालील
मुले25मी.फ्री स्टाईल (विथ फ्लोट) 1) कु.परम दिनकर सावंत प्रथम क्रमांक 2) कु. वत्सल दीपक घवाळीद्वितीय क्रमांक. 3) कु. आरंभ अभिजित मुकादम तृतीय क्रमांक मुली (5वर्षा खालील) 1) कु.आणवी देवेंद्र मंजुळे _ प्रथम क्रमांक. 2) कु. हिंदवी रणदीप साळुंखे द्वितीय 3) कु. अन्वी तेजस श्वेता पायरे तृतीय.
7 वर्षा खालील मुले 25मी फ्रीस्टाईल (विथ फ्लोट) 1) कु. सिद्धार्थ अमृत औधडेप्रथम क्रमांक. 2) कु. हर्षित अतुल शेलार _ द्वितीय क्रमांक.3) कु.देव कपिल सुर्वे _ तृतीय क्रमांक
मुली : 1) कु. रूहीं मनोज सनगरे _ प्रथम क्रमांक. 2) कु. पर्णी ओंकार विलणकर _ द्वितीय क्रमांक 3) कु. सुहैरा मोहम्मद तस्निन कडगांवकर तृतीय क्रमांक. 8 वर्षा खालील मुले 25मी फ्रीस्टाईल (विथ फ्लोट) 1) कु.आद्य ओंकार शेरे प्रथम क्रमांक. 2) कु. सिदान सुरज लवंड _ द्वितीय क्रमांक. 3) कु. धनुज सवाईराम _ तृतीय क्रमांक. मुली _ 1) कु. हिर विक्रम जैन _ प्रथम क्रमांक. 2) कु. जैनब मोसीन काझी _ द्वितीय क्रमांक 3) कु. ग्रेस जेम्स मसोजी _ तृतीय क्रमांक














