रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले ३२ कोटींचे अनुदान

रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ व्या हप्त्याचा लाभ वितरित केला. याचा मुख्य कार्यक्रम भागलपूर (बिहार) येथे होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबाला (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये या प्रमाणे तीन समान हप्त्यात दरवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे इकेवायसी
केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर कृषी संशोधन केंद्र व सर्व कृषी विज्ञान केंद्रांमध्ये (KVKs) कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधीसह प्रगतीशील शेतकऱ्यांना आमंत्रित केले आहे. किसान सन्मान समारोह अधिक प्रभावी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर विविध योजनांची माहिती व योजनेंतर्गत लाभ वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामस्तरावर तसेच सर्व नागरी सुविधा केंद्रांवर त्या दिवशी अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी नोंदणीची प्रक्रिया कार्यक्रमाच्या स्थळी राबविण्यात आली. कृषी विषयक योजनांची माहिती प्रदान करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 25/Feb/2025