ब्रेकिंग : Shiv chhatrapati award winners list | अविनाश साबळेसह ४७ खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित; राज्य सरकारची घोषणा

मुंबई : Shiv chhatrapati award winners list बीड ते ऑलिम्पिक असा प्रवास करणाऱ्या अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य ४७ जणांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

खेळाडूंसह त्यांना धडे देणाऱ्या प्रशिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. यंदाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना घोषित जाहीर झाला.

पुरस्कार विजेत्यांची नावे –
प्रदीप गंधे (जीवन गौरव पुरस्कार), पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), शुभांगी रोकडे (धनुर्विद्या), अनिल घाटे (कबड्डी), राजाराम घाग (दिव्यांग खेळाचे क्रीडामार्गदर्शक), दिनेश लाड (थेट पुरस्कार-क्रिकेट), सुमा शिरुर, अविनाश साबळे, दीप रामभीया, आदित्य मेहता, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, प्रतिक पाटील, गिरीश काते, कुणाल कोठेकर, अक्षय तरळ, रुद्रांक्ष पाटील, शाहू माने, सुहृद सुर्वे, श्रेयस वैद्य, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, रेनॉल्ड राफेल, निलम घोडके, शुशिकला आगाशे, कशीश भराड, जान्हवी जाधव, रुपाली गंगावणे, रुचिता विनेरकर, याश्वी शाह, दिया चितळे, श्रुती कडव, पूनम कैथवास, अक्षता ढेकळे, अपूर्वा पाटील, अंकिता जगताप, पंकज मोहिते, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे, जयंत दुबळे, कस्तूरी सावेकर, अफ्रीद अत्तार, निलेश गायकवाड, अन्नपूर्णा कांबळे, निलेश गायकवाड, अनिता रामधन, लताताई उमरेकर, प्रियेषा देशमुख, नताशा जोशी, प्रांजली धुमाळ,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 03-10-2024