रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलींचे इनडोअर टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मुलींचे इनडोअर टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी होणार आहेत.

या इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2025 रोजी कृषी भवन येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष व राजापूर विधानसभा आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तरी या स्पर्धेला जास्तीत जास्त संघानी भाग घ्यावा, असे आवाहन रत्ना. जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव बिपिन बंदरकर कार्याध्यक्ष दत्तात्रय साळवी व इतर सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

सदर स्पर्धा शांतीनगर बाजार समितीच्या आर्टिफिशल टर्फ येथे टेनिस सॉफ्ट बॉल वर होणार आहेत. 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

तरी पहिल्या 16 संघाना प्रवेश दिला जाईल, संघानी दिनांक 27/02/2025 दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्या संघाची नावे सह सचिव बलराम कोतवडेकर (9921003394) यांच्या जवळ कळवावी, असे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:46 25-02-2025