खेड : तालुक्यातील तुंबाड-शिबलीवाडी बंदर ते आजणी रेल्वेस्थानकदरम्यान जगबुडी नदीवर पक्का पूल बांधण्याबाबतचे निवेदन बहिरवली कुणबी समाज शेतकरी संघाच्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांना देण्यात आले. बहिरवली कुणबी समाज शेतकरी संघाच्या सभेत तसा ठरावही करण्यात आला.
तुंबाड, सवणस, बहिरवली क्रं. १, बहिरवली चौगुले मोहल्ला, होडखाड, पन्हाळजे, सवणस खुर्द, सवणस मुळगाव, आमशेत, कर्जी, राजवेल, कर्जी, मुंबके, तळघर, अणसपुरे, भडवले, फरारे, उन्हवरे, तामोंड, दमामे, कात्रण, पोफळवणे आदी गावातील नागरिकांना रेल्वेने प्रवासासह लोटे औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्याकरिता पूल सोयीचा ठरणार आहे. याठिकाणी पुलाची उभारणी झाल्यास दळणवळणासह पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने तुंबाड-शिबलीवाडी ते आंजणी रेल्वेस्थानकाला जोडणारा जगबुडी नदीवर पक्का पूल बांधण्याची उचित कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 25/Feb/2025














