देवरुख : काशी, ऋषिकेश, हरिद्वार येथील गंगा आरतीच्या धर्तीवर देवरूखच्या पवित्र सप्तलिंगी नदीच्या तीरावर प्रथमच सप्तलिंगी आरती उद्या बुधवारी (ता. २६) सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
नदीघाटावर ही आरती होणार आहे. ज्यांना महाकुंभात सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर काशी विश्वेश्वर मंदिर (वरची आळी, देवरूख) येथे मणिकर्णिका घाटावर आरतीचा सोहळा होणार आहे. ज्यांना आरती धरायची आहे त्यांनी वैभव पवार व अण्णा बेर्डे यांच्याकडे नावनोंदणी करायची आहे. देवनगरी देवरूख क्रांती व्यापारी संघटना, काशी विश्वेश्वर मंदिर समिती यांनी हा सोहळा आयोजित केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 25/Feb/2025









