लांजा : तालुक्याच्या आठवडा बाजारामध्ये येणारे परजिल्ह्यातून किंवा परप्रांतीय व्यापारी, फेरीविक्रेते व व्यावसायिक यांची नोंदणी व आधार कार्ड तपासणी मोहीम लांजा पोलिसांमार्फत आजपासून सुरू करण्यात आली आहे. मंगळवार लांजा तालुक्याचा आठवडा बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्हा बाहेरील फिरते व्यापारी व्यापारासाठी बाजारात येतात. या व्यापाऱ्यांची नोंद नाही. कुठून येतात? आधार कार्ड आहे की नाही? याची खातरजमा करण्यात येणार आहे. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 25/Feb/2025













