साडवली : सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देवरूख-रत्नागिरी मार्गावर रनागझरी निवे बुद्रुक येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातातील मृत युवकाचे नाव मिलन जसबीर बोहरा असे असून तो मूळचा नेपाळचा आहे. मिलन बोहरा हा युवक बजाज पल्सर हे दुचाकी वाहन चालवीत होता, तर नितीन कृष्णा मोहिते (वय ४१) बोलेरो पिकअप चारचाकी वाहन चालवीत होते. दुचाकीस्वार रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होता.
रात्री साडे अकराच्या सुमारास या दोन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलीसपाटील शांताराम इप्ते यांनी देवरूख पोलिस ठाण्यात दिली. मंगळवारी देवरूख पोलिस ठाणे येथे संबंधित अपघाताची नोंद करून नितीन मोहिते या बोलेरो पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 26/Feb/2025














