Champions Trophy : ब गटात उपांत्य फेरीचे समीकरण गुंतागुंतीचे..

Afghanistan In Champions Trophy : पाकिस्तानमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तान संघासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला, असला तरी अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.

पावसामुळे अफगाणिस्तान संघाला ही संधी चालून आली आहे. मात्र अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीसाठी अजूनही आपली पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे हा सामना पूर्णपणे वाहून गेला. हा सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाला.

ब गटात उपांत्य फेरीचे समीकरण गुंतागुंतीचे

सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. दोन्ही संघांचे 3-3 गुण आहेत. आफ्रिकन संघ 2.140 च्या चांगल्या नेट रन रेटसह ब गटात अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा निव्वळ रन रेट 0.475 आहे. यानंतर इंग्लंड आणि अफगाणिस्तान आहेत. दोघांनी आत्तापर्यंत 1-1 सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघांनी पराभव पत्करले आहेत. हा सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला काहीसा फायदा झाला आहे. तर इंग्लंड आणि आफ्रिकेसाठी ही करा किंवा मरो अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे ब गटातील उपांत्य फेरीचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. तर अफगाणिस्तान संघासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

  • ऑस्ट्रेलियाला आता गटातील शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी कांगारू संघाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. हा सामना जिंकल्याने संघाचे 5 गुण होतील आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
  • आफ्रिकेलाही शेवटचा सामना खेळायचा आहे, जो इंग्लंडविरुद्ध असेल. हा सामना त्याच्यासाठी करा किंवा मरो असा असणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आफ्रिकेलाही हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. या दोन्ही सामन्यांचे निकाल असेच आले तर ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका प्रत्येकी 5 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील. तर इंग्लंड आणि अफगाण संघ बाहेर पडतील.
  • दुसरीकडे, इंग्लंड संघाला अजूनही 2 सामने खेळायचे आहेत, जे अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहेत. इंग्लिश संघाने हे दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यासह कांगारू संघही पात्र ठरेल. तर आफ्रिका बाद होईल.
  • अफगाणिस्तान संघाला अजून 2 सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. अफगाणिस्तान संघाने आपली सर्व ताकद पणाला लावली आणि दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. या स्थितीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ बाद होतील. तर आफ्रिका पात्र ठरेल.

अफगाण संघाने यापूर्वी इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघ कमकुवत मानला जात असला तरी मोठ्या संघांना कसे पराभूत करायचे हे कळत नाही असे नाही. गेल्या वर्षी, एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, अफगाण संघाने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन बलाढ्य संघांना पराभूत करून आपली क्षमता सिद्ध केली. या विश्वचषकात अफगाण संघाने नेदरलँड्सविरुद्ध चौथा विजय मिळवला. या संघाने त्या स्पर्धेत आणखी एक सामना जिंकला असता तर उपांत्य फेरीचा दावेदार ठरू शकला असता. या विश्वचषकात अफगाण संघाने ऑस्ट्रेलियालाही घाम फोडला होता. कांगारू संघाने 291 धावांचे लक्ष्य गाठताना 7 विकेट गमावल्या होत्या. एकेकाळी हा सामना अफगाणिस्तान संघाच्या हातात असल्याचे दिसत होते. याच सामन्यात दुखापतग्रस्त असतानाही ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 201 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलची विकेट पडली असती तर अफगाणिस्तानचा संघ हा सामना जिंकू शकला असता.

अफगाणिस्तान संघाने T20 फॉरमॅटमध्ये एकदा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यांना कमी लेखता येणार नाही. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या संघाने यावेळेस पुन्हा तोच जोश दाखवत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर ते इतिहास घडवतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 26-02-2025