गुहागर : शृंगारतळीत बळीराज सेनेचा मेळावा

गुहागर : बळीराज सेना गुहागर तालुक्याच्या वतीने आयोजित कौशल्य विकास मेळावा शृंगारतळी येथे झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाध्यक्ष अशोक वालम उपस्थित होते.

यावेळी लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भानगरत, पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश भाईजे, सरचिटणीस प्रकाश तरल, संभाजी काजरेकर, जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, जिल्हा महिला आघाडी प्रमुख नंदिनी खांबे, अस्मिता शिगवण, विधानसभा महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर, स्वप्नाली डावल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, पक्षाचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शहर अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

या जनमेळाव्याचे औचित्य साधून गुहागर तालुका बळीराज सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका संपर्कप्रमुख मनोहर घुमे, संतोष निवाते, अमित काताळे, प्रशांत भेकरे, तालुका अध्यक्ष अरुण भुवड, सचिव अॅड. दिनेश कदम, खजिनदार संतोष गोरीवले, शृंगारतळी शहर अध्यक्ष सुभाष राजपूत, गुहागर शहर अध्यक्ष विकास भागडे, विभागप्रमुख अशोक रावणंग, विजय शिगवण, ज्ञानदेव अवेरे, तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष श्रावणी शिंदे, रितिका पवार यांनी स्वागत केले.

यानंतर सर्वप्रमुख पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सचिव अॅड. दिनेश कदम व मनोहर घुमे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण भुवड, नीलेश कदम, ऐश्वर्या कातकर, स्वप्नाली डावल, श्वेतांबरी मोहिते, विकास भागडे, सुभाष रजपूत, अशोक रावणग, रुतिका पवार, स्वाती देवकर, सर्व शाखाप्रमुख, तालुका कार्यकारिणी सदस्य, महिला आघाडी यांनी विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 26/Feb/2025