US Citizenship Rule : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा सत्ता हाती घेतल्यानंतर अनेक उलथापालथी सुरू केल्याचं दिसतंय. त्याचा परिणाम हा अमेरिकेसहित जगभरावर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतालाही फटका बसला असून त्या देशात अवैध पद्धतीने राहणाऱ्या भारतीयांना पुन्हा भारतात आणून सोडण्यात आलं आहे.
त्याचवेळी अमेरिकन नागरिकता घ्यायची असेल तर ट्रम्प यांनी एक वेगळी योजना जाहीर केली. जगभरातील कोणत्याही नागरिकाला अमेरिकेचे नागरिकत्व विकत घेता येणार आहे. 5 मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात सांगायचं झालं तर 43 कोटी रुपये गुंतवले आणि काही प्रक्रिया फॉलो केली तर अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे.
नवीन नियमानुसार अमेरिकेचे नागरिकत्व घ्यायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्या प्रक्रियेचे पालन केल्यानंतरच तुम्हाला अमेरिकन नागरिकत्व मिळू शकेल. पण असे करणारा अमेरिका हा असा पहिला देश नाही. जगात असे अनेक देश आहेत जिथे पैसे देऊन नागरिकत्व मिळते.
डोनाल्ड ट्रम्प नंतर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, त्याआधी ते एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योगपती होते. व्यवसाय कसा वाढवायचा हे त्यांना चांगलेच माहीत आहे. दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीतून त्यांचे व्यावसायिक कौशल्य पुन्हा स्पष्टपणे दिसून येते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांना बाहेर काढत आहेत. दुसरीकडे नागरिकत्व विकण्याचा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
ट्रम्प यांच्याकडून गोल्ड कार्ड लॉन्च
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत 5 दशलक्ष डॉलर्सचे गोल्ड कार्ड लॉन्च केले आहे. त्याला अमेरिकन ग्रीन कार्ड म्हणतात जे कायम नागरिकत्वाचा पुरावा आहे. याला त्या कार्डचे प्रीमियम व्हर्जन म्हटले जात आहे. त्यात अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. पण नवीन सुरु झालेला हा नागरिकत्व कार्यक्रम सिटीझन बाय इन्व्हेस्टमेंट अंतर्गत असेल. जे जगातील अनेक देशांमध्ये आहे.
या देशांत पैसे देऊन नागरिकत्व मिळते
अमेरिका हा एकमेव देश नाही जिथे पैसे देऊन नागरिकत्व मिळते. जगात असे अनेक देश आहेत. जिथे तुम्ही सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट (CBI) च्या आधारे नागरिकत्व घेऊ शकता. UAE मध्ये, तुम्हाला 1.36 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 11.5 कोटी रुपये देऊन गोल्डन व्हिसा मिळतो. याशिवाय, तुम्ही चार लाख डॉलर्स म्हणजेच 3.3 कोटी रुपयांची रिअल इस्टेट गुंतवणूक करून तुर्कियेमध्ये नागरिकत्व मिळवू शकता.
मॉरिशसमध्ये 5 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 4.1 कोटी रुपयांची गुंतवणूक करून नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय 5 लाख युरो म्हणजेच 4.5 कोटीमध्ये भारतीयांना स्पेनचे नागरिकत्व मिळेल. जगात इतर अनेक समान देश आहेत जिथे तुम्ही अशा प्रकारे नागरिकत्व घेऊ शकता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:38 26-02-2025














