Pune Rape Swargate Depot: कंडोम, साड्या, अंतर्वस्त्र.. स्वारगेटच्या बंद बसेसमध्ये काय काय? वसंत मोरेंकडून आगारातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड

Swargate Bus Depot | पुणे : वसंत मोरे यांनी बस स्थानकावर जात आगारात कोण कोणते गैरप्रकार सुरु आहेत, याबाबत भाष्य केलंय. यावेळी बंद असलेल्या बसेसमध्ये कंडोम, साड्या आणि अंतर्वस्त्र सापडल्या आहेत.

पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेस मध्ये साडी, शर्ट आणि कंडोम्स सापडल्यानंतर वसंत मोरेंनी आगारातील कार्यालयाची तोडफोड केली आहे.

रात्रीच्या वेळी या बसमध्ये काय प्रकार घडत असतील याचा अंदाज होईल. त्यामुळे बसस्थानक सुरक्षित नसल्याचं चित्रांतून स्पष्ट होत आहे. बस स्थानकावर शेकडो कंडोम्स पडलेत म्हणजे इथे रोज बलात्कार होत असतील, असं वसंत मोरेंनी म्हटलंय.

शिवाय, स्वारगेट स्थानकात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी देखील वसंत मोरेंनी केली आहे.

फलटणकडे जात असलेल्या तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर स्वारगेट स्थानकातील गैरप्रकार समोर येत आहेत.

कंडोम्स, कपडे सापडल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

वसंत मोरेंनी या सर्व परिसराची पाहाणी केली असून आक्रमकपणे भाष्य केलंय.

वसंत मोरे काय म्हणाले?

“4 एसटींचे या लोकांनी लॉजिंग केलं आहे. याचा अर्थ असा होतो की, याच नालाईक लोकांच्या, याच सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत इथे रोज बलात्कार होतात. तुम्ही मीडिया म्हणून जावून पाहिलं तर याच एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात कंडोम पडले आहेत. तिथे शेकडो कंडोम पडले आहेत. याचा अर्थ हा प्रकार इथे रोज होतोय. यामध्ये या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा हात आहे. ते इथे काय करतात? इथे बसून ही लोकं फक्त केबिन उघडायला आहेत का? ज्या वेळेस बलात्कार घडला त्यावेळी गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती”, असा आरोप वसंत मोरे यांनी केला.

वसंत मोरेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य?

वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात उभ्या असलेल्या जुन्या चार बसजवळ माध्यमांच्या प्रतिनिधींना नेलं. या जुन्या बस गाड्यांमध्ये खरंच प्रचंड अस्वच्छता बघायला मिळाली. विशेष म्हणजे या बसमध्ये जुने कपडे, साड्या विखुरलेल्या होत्या. तसेच कंडोमचे अक्षरश: खच बघायला मिळाले. शंभर पेक्षा जास्त कंडोम एका बसमध्ये असतील, असा दावा वसंत मोरे यांनी केला. यावेळी वसंत मोरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. बसमध्ये आढळल्या वस्तू पाहता इथे महिला आणि मुलींवर रोज अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 26-02-2025