स्वारगेट शिवशाही प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर

पुणे : स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे त्या नराधमाचे नाव आहे.

पुणे पोलिसांचे पथक आरोपी दत्तात्रय गाडेच्या घरी दाखल झाले आहे. मात्र गाडे घरी नसून तो फरार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपी खाडे याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गाडे याच्यावर पुण्यासह शिरूर मध्ये सुद्धा चोरी, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं सुद्धा गाडेचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या आठ पथकांडून आरोपीचा शोध सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 26-02-2025