खेड : तालुक्यातील अठरा गाव बांद्री विभागातील नांदिवली गावातील काळेवाडी येथे रविवारी (दि. २३) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूला सुरू असलेल्या गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून संशयीत आरोपीत लक्ष्मण रामा आखाडे (वय ६१) याच्यावर गुन्हा दखल केला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी नितिन रामदास चव्हाण यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी छापा टाकून दोन हजार रुपये किमतीची वीस लीटर दारूचे रसायन व ग्लास असा एकूण दोन हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपीत लक्ष्मण रामा आखाडे (४१) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 27/Feb/2025












