मांडवी येथील वृद्धाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू

रत्नागिरी :– शहरातील मांडवी येथील वृद्धाला अशक्तपणा व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. दीपक गणपत शिंदे (वय ६५, रा. मायनाकवाडी, मांडवी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) सकाळी सातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपक शिंदे यांना अशक्तपणा व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 27-02-2025