तरवळ येथे एसटी बसला धडक देणाऱ्या डंपर चालकावर गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे डंपर चालवून समोरुन यणाऱ्या एसटीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी डंपरचालका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ वा. सुमारास तरवळ माचिवलेवाडी येथे घडली होती. विनोद शोभनाथ यादव (४०, रा. जोनपूर, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डंपर चालकाचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस कर्मचारी महेश टेमकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी विनोद आपल्या ताब्यातील डंपर (एमएच-०४-एफयू-१७९७) घेउन निवळी ते जयगड असा जात होता. तो तरवळ माचिवलेवाडी घोडेखिंड या ठिकाणी आला असता रस्त्याच्या डाव्या बाजुला उभ्या असलेल्या झेनॉन पिकअप टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने समोरुन येणाऱ्या एसटी (एमएच-०८-डब्ल्यू-४८९९) ला धडक देत हा अपघात केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 27/Feb/2025