संगमेश्वर : शिवसेना संगमेश्वर तालुका प्रमुख नंदादीप बोरुकर एसटीच्या व्यवस्थापक कर्मचारी यांच्याशी आगारातील समस्या व इतर बाबतीत काल चर्चा करीत असताना एक चालक मद्यधुंद अवस्थेत तेथे दाखल झाला. तो तेथे गोंधळ घालू लागला. त्या एसटी कर्मचाऱ्याला अधिकारी वर्गाने कार्यालयाबाहेर हाकलून दिले. बाहेर जाताना त्याने हेल्मेट बंड्या बोरुकर यांच्या डोक्यात आपटले व अंगावर धावून गेला. त्याबरोबर तेथे जमा झालेल्या लोकांनी त्याला चोप दिला.
आगार व्यवस्थापक यांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने याचे गांभीर्य ध्यानात घेऊन देवरूख पोलिस ठाण्यात त्या चालकाविरोधात तक्रार दिली. असे चालक जर गाड्या चालवत असतील, तर ते प्रवाशांच्या जिवाशी खेळच म्हटला पाहिजे. असे नंदादीप बोरुकर यांनी अधिकारी वर्गाला सुनावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 28/Feb/2025














