माखजन : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील श्री देव आमनायेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त २८ रोजी ‘कोन नाय कोनचा’ नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. श्री आमनायेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ पुरस्कृत हे नाटक सादर होणार आहे. स्थानिक कलाकारांची नाटकाची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता २ अंकी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य प्रयोगापूर्वी मा सत्कार समारंभ होणार आहे. नाट्य प्रयोगाला उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष संजय सहस्त्रबुद्धे, सचिव समीर शिंदे, खजिनदार शशिकांत घाणेकर आदींसह अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 28/Feb/2025














