मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेचं साहित्य, कला जगभरात पोहोचण्यासाठी जास्त मदत होणार आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गेल्या 60 वर्षांपासूनची मागणी होती. अखेर ही मागणी मान्य झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!”, असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 04-10-2024