शांतादुर्गा पिलणकरीन देवस्थानचा रविवारी दिवजोत्सव

रत्नागिरी : गोवा राज्यातील डिचोली तालुक्यातील नार्वे, गावकरवाडा येथील पिलणकर कुटुंबीयांची कुलदेवी शांतादुर्गा पिलणकरीन देवस्थानचा १६वा वर्धापन दिन (दिवजा) २ मार्चला साजरा होणार आहे.

सकाळी ९ पासून नवचंडी स्वाहाकार याग विधी, यजमान अल्केश पिळणकर, मेरशी-गोवा कुटुंबाकडून होणार आहे. देवीची पूजा, कुंकुमार्चन, अभिषेक नंतर दुपारी १ वाजता महाआरती, महाप्रसाद होईल. नंतर भजन, संध्या, ७ वा. पालखी ओटी भरणे, पालखी प्रदक्षिणा, सुहासिनींचा दिवजोत्सव (पाच ज्योतीचा दिवा) हा मुख्य कार्यक्रम होईल. रात्री ८ नंतर पिलणकर परिवारातील सदस्य नृत्य, भाषण, वेशभूषा स्पर्धा होणार आहे. रात्री आरतीनंतर (पावणी) लिलाव होईल. रात्री मधलावाडा, नार्वे बालकलाकारांसह दिग्दर्शक नारायण बर्वे २ अंकी पौराणिक नाटक युद्धाचं आव्हान सादर करतील. पिलणकर बांधवांनी, भाविकांनी दिवजोत्सवास येऊन दर्शनाचा लाभघ्यावा, असे शांतादुर्गा पिलणकर प्रासादिक उत्कर्ष मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 28/Feb/2025