रत्नागिरी : कळझोंडी येथे पापड प्रशिक्षणाला प्रतिसाद

गणपतीपुळे : रत्नागिरी येथील युवा परिवर्तन संस्थेच्या विद्यमाने कळझोंडी पंचशील नगर येथे महिलांना पापड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये युवा परिवर्तन संस्था रत्नागिरी येथील प्रशिक्षक नाझपरवीन परदेशी, क्षेत्र व्यवस्थापक वृषाली सुर्वे, रिटेल सेल्स असोसिएट ट्रेनर आफशा परदेशी, विभागाचे मेनेजर वैभव कांबळे त्याचबरोबर पापड प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या महिला तथागत बचतगट, पंचशील बचत गट, आदर्श महिला बचत गटांतील बहुसंख्य महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.

कळझोंडी सारख्या ग्रामीण भागातील महिलांना हाताला काम मिळावे, महिला स्वावलंबी बनविण्यासाठी, स्व:ताच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. छोटे छोटे व्यावसायिक शिक्षण घ्यावे या स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम राबविण्यात यावे यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पापड बनविणे प्रशिक्षण देण्यात आले. त्याबद्दल पंचशील नगर कळझोंडी येथील प्रशिक्षणार्थी महिलांनी त्यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 28/Feb/2025