चिपळूण : महाकाली देवीची लाट आणली वाजतगाजत

चिपळूण : शिरगाव कुंभार्ली-पोफळीचे जागृत देवस्थान असलेल्या सुखाई-वरदायिनी महाकालीदेवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता. २७) पोफळीतून शिरगावमार्गे कुंभार्ली येथे वाजतगाजत लाट आणण्यात आली. यावेळी पोफळी सय्यदवाडी येथील मुस्लिम बांधवांनी लाटेला खांदा देणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

शिरगाव कुंभार्ली-पोफळीचे जागृत देवस्थान असलेल्या सुखाई-वरदायिनी महाकालीदेवीच्या यात्रेला महाशिवरात्रीपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या दिवशी लाट तोडली जाते. यात्रेच्या आदल्या दिवशी ढोलताशा, सनईच्या गजरामध्ये शिरगांवमधील ग्रामस्थ मंदिरापर्यंत लाट आणतात. शुक्रवारी शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने ही लाट पोफळीतून शिरगावमार्गे कुंभार्लीत वाजतगाजत आणण्यात आली. यावेळी अंजुमन जमातुल मुस्लिमीन पोफळी सय्यदवाडीतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 01/Mar/2025