देवरुखातील कामे लवकर मार्गी लागणार : आमदार शेखर निकम

साडवली : चिपळूण संगमेश्वर विधानसभा निवडणुकीवेळी आपण विविध विकासकामांची जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता या भूमिपूजन सोहळ्यांनी होत आहे. देवरुख परिसरातील ही कामे लवकरच मार्गी लागतील. तसेच यापुढेही जो निधी लागेल तोही आपण देऊ, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.

गुरुवारी (ता. २७) देवरुख परिसरातील विविध विकासकामांच्या भूमिमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हेवाडी येथील सभागृह, हसमवाडी येथील रस्ता, शाळा नं. १ जवळील पूल, शाळा नं. २ इमारतीसाठी निधी, पठारवाडी देवस्थान सभागृह, कांजिवरा व मुस्लिम मोहल्ला मशीद व मदरसा लादीकरण, सभागृह उभारणी, शाळा क्र. ४ जवळील गटार, खालची आळी येथे खेळाचे मैदान, पर्शरामवाडी पाखाडी व संरक्षक भिंत उभारणी या कामांचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, वैभव पवार, अभिजित शेट्ये, मुकुंद जोशी, सुशांत मुळ्ये, तुकाराम किर्वे, डॉ. हुसेन शेख, संतोष लाड, जयंत राजवाडे, संजय राजवाडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 01/Mar/2025