नवी दिल्ली : सुप्रसिद्ध बँकर, गायीका, सामाजिक कार्यकर्ती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांना ‘बंजारा कला रत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
श्रीमती फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांचे गुणगाण करणाऱ्या गाण्यांवर आधारित अल्बमध्ये ‘मारो दवे सेवालाल….’ हे गेय गीत गायले तसेच अभिनय ही केला. त्यांचे हे गाणे बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय ठरत आहे.
श्रीमती फडणवीस यांनी त्यांचे मनोगताची सुरवात गोर या बोली भाषेतून करून उपस्थित समाजाची मने जिंकली. त्यांनी सांगीतले संत सेवालाल यांच्याबद्दलची अधिक माहिती गीत गाताना कळली. संत सेवालाल यांच्या आशीवार्दाने मी हे गाण गाऊ शकले. संत सेवालाल हे गोमाता प्रिय, स्त्रींचा आदर राखणारे, पर्यावरण प्रिय, सामान्य लोकांप्रती दयाभाव राखणारे असे महान संत होऊन गेले. संत सेवालाल हे आधुनिक आणि अध्यात्मिक दोन्हींचे मुर्तिमंत उदाहरण आहेत. आपण याच समाजाचा एक भाग असल्याचे आपल्याला प्रतित हो असल्याच्या भावना त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. या कार्यक्रमात त्यांनी पांरपारीक वेशभूषा धारण केलेल्या महिलांसोबत नृत्यही केले.
कार्यक्रमात देशभरातील 15 राज्यातून बंजारा समाजातील लोक त्यांच्या पांरपारीक वेशभूषेत सहभागी झालेत. सोलापूर जिल्ह्यातून खास मोठा हार स्वागतासाठी आणण्यात आला. या कार्यक्रमात लोक गीत आणि लोकनृत्य लोक कलाकरांनी सादर केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 01-03-2025














