देवपूजा करताना अस्वस्थ वाटू लागले.. गणपतीपुळे-सोनारवाडीतील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे-सोनारवाडी येथे अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वा. घडली. संजय बाळकृष्ण देवरुखकर (वय ५९, रा. सोनारवाडी गणपतीपुळे, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

बुधवारी सकाळी ते राहत्या घरी देवपूजा करत होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 04-10-2024