Temperature Alert: जागतिक हवामान परिषदेने जागतिक तापमानात सरासरी दीड अंशांनी वाढ झाल्याचे स्पष्ट केले असून जानेवारी 2025 हा महिना आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदला गेला आहे.
वातावरणातील अडथळे असलेले अल निनो व ला नीनो ही दोन्ही संकटे या वर्षी स्थिरावलेली आहेत. यामुळेच तापमानात होणारे कमी-अधिक बदल देखील यंदा स्थिरावण्याची शक्यता आहे.
परिणामी वाढलेले तापमान कमी करण्यासाठी कुठलाही नैसर्गिक पर्याय नसल्याने हे तापमान वाढत्या क्रमात राहण्याची शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे.
उच्च व अत्युच्च तापमानासाठी देश व जगात चंद्रपूरची ख्याती आहे. मात्र यावर्षी देखील चंद्रपूर जिल्ह्याचं उष्णतामान विक्रमी व वाढलेले राहील अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.चंद्रपूरसाठी मार्च- एप्रिल- मे हे महिने अधिक तापमानाचे असतात.
याला प्रमुख कारण इथलं प्रदूषण असलं तरी तापमानाची ही स्थिती बघता मनपा आणि जिल्हा आरोग्य विभागाने आतापासूनच उष्णता रोधी कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
विविध सार्वजनिक व शासकीय रुग्णालयांमध्ये शीतकक्ष स्थापन केले जात असून उष्णता व तापमानापासून ग्रस्त रुग्णांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात आहे.
ब्रह्मपुरीत 38.6°एवढ्या देशभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 38.5 अंश सेल्सिअस एवढा पारा गेला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 03-03-2025














