बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवून पुढील दुचाकीला मागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. सुमारास गोळप येथे घडली. रवि मोहन गोसावी (रा. मेर्वी मांडवकरवाडी स्टॉप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. मंगळवारी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एबी-७५९६) वर पाठीमागे साहील शफिक मुजावरला बसवून रत्नागिरी ते पावस असा भरधाव वेगाने येत होता.

तो गोळप येथील ऊमिया ट्रेडर्स समोर आला असता त्याने पुढील दुचाकी (एमएच-०८-एएच-१०२०) ला मागून ठोकर देत अपघात केला. या अपघातात रवि गोसावीच्या दुचाकीवर मागे बसलेला शफिक मुजावर आणि पुढील दुचाकीवरील संदीप महादेव आग्रे (४७) या दोघांना लहान-मोठ्या दुखापती हो ऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 03/Mar/2025