रत्नागिरी : आजकाल विविध प्रकारची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे. मुली महिलांना अशी आकर्षक ज्वेलरी फार आवडते. अनेकींना अशी आधुनिक ज्वेलरी स्वतः करायची इच्छा असते.
तर काहींना येत असली तरी विविध डिझाईन्स मिळाली तर हवी असतात. पण आपल्या आजूबाजूला पटकन असे काही उपलब्ध होतेच असे नाही. हाच मुद्दा विचारात घेऊन इन्फिगो फाउंडेशने सामाजिक जाणिवेतून व महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावे याकरिता आपल्या रत्नागिरीमध्ये आधुनिक ज्वेलरी मेकिंगचे कौशल्य प्रशिक्षण शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आयोजित केले आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाईन व ज्वेलरी मेकर सौ. अश्विनी करकरे या प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ ते ६ यावेळेत शहरी महिलांसाठी तर दि.७ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत ग्रामीण भागातील महिलांसाठीचे हे प्रशिक्षण इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, साळवी स्टाॅप, रत्नागिरी येथे होणार आहे.
यामध्ये लागणारे विशेष प्रकारचे साहित्य इन्फिगो फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय स्वतः तयार केलेला बांगड्या , हार व कानातले असा सेट प्रत्येकीला मिळणार आहे , तो ही मोफत. पाच जणींच्या गटाने नोंदणी केल्यास गटाला कात्र्यांचा एक सेट मोफत मिळणार आहे.
शिवाय चहा नाश्ता सोय करण्यात आली आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाईन व ज्वेलरी मेकर सौ. अश्विनी करकरे ज्वेलरी शिकवणार आहेत. तरी सहभागासाठी आजच ९४२०६२७५०५ या नंबरवर आपले नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करा. तसेच इच्छुकाचे नाव, पत्ता व फोन नंबर वरील व्हाट्सअँप नंबरवर पाठवून आपली नोंदणी पूर्ण करा. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित आहेत. नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमाविषयी अधिक तपशील वैयक्तिक कळविण्यात येईल. दिनांक ४ मार्च २०२५ अखेर पर्यंत नोंदणी मुदत आहे. तरी अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे इन्फिगो फौंडेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 03-03-2025














