गुहागर : श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळ, मुंबई आयोजित सनगरेवाडी चषक २०२५ उत्साहात संपन्न

गुहागर : दि. २ मार्च २०२५ रोजी मुंबई वसई येथे श्री. सनगरे वाडी सार्वजनिक मंडळाच्या क्रीडा समिती मार्फत भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश कावणकर, श्री संतोष आलीम आणि मंडळातील इतर मान्यवर मंडळी यांच्या शुभहस्ते उद्धाटन करण्यात आले.

या स्पर्धेत गुहागर तालुक्यातील वाडी मर्यादित २४ संघ सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश धनावडे, श्री विजय गोताड, श्री अनंत मालप आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

स्थानिक मंडळाचे पदाधिकारी खास गावावरून ह्या स्पर्धेसाठी आले होते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व प्रायोजक आणि सर्व सहभागी संघांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री सनगरेवाडी सार्वजनिक मंडळाकडून क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक असे अनेक उपक्रम राबविले जातात. प्रथम फेरीचे सर्व सामने ४ षटकांचे आणि पुढील सर्व सामने ३ षटकांचे खेळविण्यात आले. दिवसभरातील सामन्यांनंतर स्पर्धेमध्ये सनगरेवाडी चषक २०२५ चषकाचे मानकरी ठरले .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 03-03-2025