IPL 2025 : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे Kolkata Knight Riders संघाचे नेतृत्त्व!

Kolkata Knight Riders Captain : यंदाचा आयपीएलचा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यावेळी काहीही झालं तरी ट्रॉफीवर नाव कोरायचंच अशी जिद्द बाळगून सर्वच संघ मैदानात उतरणार आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीओलचा थरार सुरू होणार आहे.

याआधीच आयपीएल स्पर्धेतील महत्त्वाच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या संघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या संघाने आपला कर्णधार ठरवला आहे. तशी अधिकृत घोषणाच या संघाने केली आहे.

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे नेतृत्त्व

अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे नेतृत्त्व आता मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य राहणे याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तशी अधिकृत घोषणा केकेआर या संघाने केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 03-03-2025