दापोली : 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन या निमित्ताने ग्रामपंचायत जालगावच्या अंतर्गत माझी वसुंधरा अभियान ५.० च्या माध्यमातून आदर्श जिल्हा परिषद केंद्र शाळा जालगाव नंबर एक या ठिकाणी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त वन्यजीवांच्या जीवनशैली आणि निसर्गचक्राबद्दल माहितीपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्पमित्र किरण करमरकर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शनात सांगितले की, १०० पैकी ९६ सर्प हे बिनविषारी असून फक्त चार जाती या विषारी असल्याची माहिती दिली. त्या समवेत बिबट्या, डुक्कर, रानमांजर, खवले मांजर, राष्ट्रीय पक्षी मोर आदी वन्यजीवांबाबत विशेष सखोल मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालक वर्ग यांना केले.
या कार्यक्रम प्रसंगी माझी वसुंधरा अभियानाचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, ग्रामपंचायत जालगाव च्या सदस्य हर्षाली तांबे, मृणाल लिंगावळे, संगिता तलाठी, ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे, शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र चौगुले, शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 03-03-2025














