खेड : उधळे बस थांब्याजवळ मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवार २ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील उधळे गावानजीक बसथांब्याजवळ एकाची गाडी थांबवून त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन मुरलीधर चव्हाण (वय २४, रा. खवटी, गजाणवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे आपल्या शयर्तीचा बैल डमरु यास शर्यतीचा सराव करण्यासाठी रविवारी २ रोजी असगणी येथे गेले होते. तेथून पुन्हा खवटी येथे पिकअप व्हॅनने (एमएच ११ सीएच ११९५) मधून बैलाला घेऊन खवटी येथे येत असताना पाठीमागून येणाऱ्या मारुती स्विफ्ट (कार क्रमांक समजून येत नाही) कारचा चालक नाव-गाव माहीत नाहीत व आनंद महादेव घोले (रा. कळबणी बुद्रुक, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी पिकअप व्हॅन मधील चालकाला पिकअप व्हॅनला थांबायला सांगितली.

मारुती स्विफ्ट मोटार चालकाने कारमधून खाली उतरुन चव्हाण याच्या कानाखाली मारुन, दुसरा संशयित आरोपी आनंद महादेव घोले याने आपल्या जवळील लोखंडी पाईपने चव्हाण यांचे उजव्या हातावर, दोन्ही पायाच्या पोटऱ्यावर, कमरेत मारहाण केली. यावेळी मारहाण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारा चव्हाण यांचा भाचा ओंकार माऊली साळुंखे यालाही मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 04/Mar/2025