लांजात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

लांजा : लांजा शहरात दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रॉयल पार्क कॉम्प्लेक्समध्ये अज्ञात चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून चोरी केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लांजा शहरात गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लांजा शहरात तीन वर्षांनी चोरीच्या घटनेने डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरात चोरांची भीती वाढली आहे. शहरातील रॉयल पार्क ही इमारत मुंबई-गोवा महामार्गनजीक असून, बसवेश्वर चौक हे शहराचे मुख्य ठिकाण आहे. दिवसरात्र वर्दळ असणाऱ्या ठिकाणी ही इमारत आहे. अशा वर्दळीच्या ठिकाणी चोरटे चोरी करू लागले असल्याने पोलिसांपुढे चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे आव्हान आहे. लांजा शहरातील लांजा बसवेश्वर चौक, लांजा बाजारपेठ लांजा एसटी स्थानक, साटवली तीठा, आंबेडकर स्मारक आदी मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असणे महत्त्वपूर्ण ठरत आहे. लांजा शहरात अनेक निवासी इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असणे आवश्यक झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 04/Oct/2024